अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- मोठ्या कष्टाने पिकवलेले कांदे विकण्यासाठी एक शेतकरी बाजारात घेवून गेला मात्र दुर्दैवाने बाजारात पोहचण्यापूर्वीच एका अपघातात त्याच्यावर काळाने झडप घातली.
कोपरगाव तालुक्यातील बेट भागात संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ काल ट्रॅक्टर – कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर खंडेराव लोहकणे (रा.कारवाडी, कोकमठाण) हा जागीच ठार झाला.
सविस्तर माहिती की, ट्रॅक्टर चालक शंकर लोहकणे हे आपल्या चुलत भावाच्या ट्रॅक्टरमध्ये आपला कांदा घेऊन कोपरगाव बाजार समितीत लिलाव करण्यासाठी जात असताना सदरचा ट्रॅक्टर हा पुणतांबा फाटा येथून कोपरगावकडे वळला असताना
नगरकडून राजस्थानकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (क्रं.आर.जे.०६,जी.सी.४६२१) या क्रमांकाच्या कंटेनरने मागील बाजूने जोराची धडक दिली.
त्यात त्या ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीररीत्या जखमी झाला होता.
त्यास नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक हा फरार झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम