Health Tips Marathi : अंडी (Eggs) ही सर्वांच्याच पसंतीचा पदार्थ आहे. सर्वजण आवडीने अंडी खात असतात किंवा त्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या भाज्या खात असतात. मात्र काहींना अंडी आवडत नाहीत किंवा त्याची ऍलर्जी (Allergies) असते. मात्र त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकता.
अंडी खाणे खूप फायदेशीर आहे, त्याच वेळी, काही लोकांना अंडी खाणे आवडत नाही. जे लोक शाकाहारी आहाराचे पालन करतात ते देखील अंडी खात नाहीत. अशा स्थितीत अंड्यांसारखी पोषकतत्त्वे कशी मिळवायची, असा प्रश्न निर्माण होतो.
अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. अशा परिस्थितीत जे लोक अंडी खात नाहीत ते या शाकाहारी गोष्टींनी अंड्याची कमतरता भरून काढू शकतात. या 3 गोष्टींचे सेवन करून तुम्ही अंड्याइतकाच फायदा मिळवू शकता.
१. सोयाबीन
तुम्ही अंडी खात नसाल तर त्याऐवजी सोयाबीन खाऊ शकता. सोयाबीन (Soybean) हा अंड्यांचा उत्तम पर्याय आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. शाकाहारी लोक त्यांच्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करू शकतात. सोयाबीनमध्ये खनिजे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए आढळतात. सोयाबीन आरोग्यासाठी चांगले आहे.
२. शेंगदाणे
हिवाळ्यात शेंगदाणे (Peanuts) खूप फायदेशीर आहे. जे अंडी खात नाहीत त्यांनी शेंगदाणे जरूर खावे. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते.
शेंगदाण्यात पॉलीफेनॉल, अँटी-ऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. यामध्ये लोह, फोलेट, कॅल्शियम आणि झिंक देखील चांगल्या प्रमाणात असते. अंड्यांऐवजी तुम्ही शेंगदाणे वापरू शकता.
३. ब्रोकोली
प्रोटीनयुक्त जेवणासाठी तुम्ही अंड्यांऐवजी ब्रोकोली (Broccoli) वापरू शकता. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि कार्बोहायड्रेट्स यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. हिवाळ्यात अंडी न खाणाऱ्यांसाठी ब्रोकोली हा एक चांगला पर्याय आहे.