Healthiest Foods : चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन करू नका, लवकर येऊ शकते म्हातारपण….

Published on -

Foods That Can Speed Up Ageing : बरेच लोक चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठी त्वचेवर अनेक गोष्टी लावतात. पण आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत असे अनेक पदार्थ खातो, जे वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवतात आणि तुम्ही लवकर वृद्ध दिसू लागत. या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे, कोलेजन कमी होणे आणि कोरडी त्वचा यासारखी वृद्धत्वाची लक्षणे वाढू शकतात.

पण आपण निरोगी आहारासोबत वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करू शकतो. तसेच, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर करा. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते आणि आपण लवकर म्हातारे दिसू लागतो. आज आपण अशा पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे त्वचेचे वय लवकर वाढते. हे पदार्थ तुम्ही शक्यतो टाळले पाहिजे. कोणते आहेत ते पदार्थ चला पाहूया…

फ्रेंच फ्राय

फ्रेंच फ्राईज शरीरासाठी खूप हानिकारक मानले जातात. ते तेलात तळलेले असल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. हे सेवन केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. हे अन्न त्वचेची लवचिकता कमी करू शकते, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याची शक्यता वाढते.

ब्रेड

बरेच लोक मोठ्या उत्साहाने सकाळी ब्रेड खातात. पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढते तसेच वृद्धत्वाची प्रक्रिया वाढते. व्हाईट ब्रेड खाल्ल्याने शरीराला हानी तर होतेच पण त्याचबरोबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळीही वाढते.

पांढरी साखर

साखर शरीरासाठी खूप हानिकारक मानली जाते. याच्या सेवनाने अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. साखर खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्सची समस्या वाढते आणि त्वचाही खूप कोरडी होते. हे चेहऱ्याच्या पेशींना नुकसान करून वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवते.

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस त्वचेसाठी हानिकारक असू शकते. त्यात सोडियम, चरबी आणि सल्फाइट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे त्वचेचे निर्जलीकरण होऊ शकते आणि जळजळ होऊन कोलेजन कमकुवत होऊ शकते. याचे सेवन केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते आणि त्वचा लवकर म्हातारी दिसू लागते.

सोडा आणि कॉफी

सोडा आणि कॉफी दोन्ही शरीराला हानी पोहोचवू शकतात. दोन्हीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि वृद्धत्वाची चिन्हे वाढतात. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेवर काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि बारीक रेषा वाढतात.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe