Heart attack : तुम्हीही अशी चूक करत असाल तर तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, वेळीच सावध व्हा

Heart attack : धावपळीच्या आयुष्यामुळे बरेच जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना अनके आजारांचा सामना ( Health Problm) करावा लागतो. जर शरीर निरोगी (Healthy) आणि तंदुरुस्त (Fit) असेल तर अनेक आजार दूर ठेवता येते.

सगळ्यात जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होतात. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा होतो हे बहुतेकांना माहीत असले (Causes of heart attack) तरी काही लोक त्याकडे दूर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना जीव गमावावा लागतो.

या चुकांमुळे हृदयविकाराचा झटका येतो

  • स्लीप डिसऑर्डर

बहुतेक आरोग्य तज्ञ चांगले आरोग्य राखण्यासाठी दिवसातून किमान 7 ते 8 तास झोपण्याची शिफारस करतात. ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही (Sleep disorder), त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो.

  • वायू प्रदूषण

मोठ्या शहरांच्या तुलनेत खेड्यातील लोकांना कमी हृदयविकाराचा झटका येतो, कारण ते स्वच्छ हवा श्वास घेतात, तर महानगरांमध्ये धूर आणि धुळीच्या कणांमुळे आपल्या हृदयाचे खूप नुकसान होते. त्यामुळे ते टाळण्याचा प्रयत्न करा. (Air Pollution)

  • धुम्रपान आणि मद्यपान

सिगारेट आणि अल्कोहोलमुळे आपल्या शरीराला खूप आंतरिक नुकसान होते हे आपणा सर्वांना माहीत आहे. या वाईट सवयींमुळे रक्तदाब वाढतो, जो पुढे हृदयविकाराचे कारण बनतो.

  • जास्त थंड तापमान

जर तुम्ही सतत खूप थंड तापमानाच्या संपर्कात असाल तर रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात आणि ते उच्च रक्तदाबाचे कारण बनते. या दौऱ्यात जड उपक्रम केल्यास हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe