लई भारी! कापसाला मिळाला 12 हजार रुपये रेट; ‘या’ ठिकाणी लागली कापसाला ऐतिहासिक बोली

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :-यावर्षी कापसाचे खऱ्या अर्थाने सोने होत आहे असं म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. गत पन्नास वर्षात या पांढर्‍या सोन्याला जेवढा दर मिळाला नव्हता तेवढा दर या हंगामात मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Growers) सुखावल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील कापसासाठी संपूर्ण राज्यात नावाजलेली बाजारपेठ म्हणजेच अकोट एपीएमसीमध्ये (Akot Agricultural Producer Comittee) कापसाला तब्बल 12 हजार रुपये प्रतिक्विंटल असा ऐतिहासिक बाजार भाव प्राप्त झाला.

असे असले तरी, या विक्रमी बाजार भावाचा फायदा फारचं कमी शेतकऱ्यांना (Farmers) मिळत असल्याचे नजरेस पडत आहे. छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपल्याजवळचा साठवलेला कापूस कधीच विक्री करून टाकला, आता ज्या शेतकऱ्यांकडे थोडाफार कापूस शिल्लक आहे ते शेतकरी सदन आहेत त्यामुळे या विक्रमी दराचा फायदा सदन शेतकऱ्यांना तसेच कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बाजारपेठेतील चित्र ग्वाही देत आहे.

या दरम्यान असे सांगितले जात आहे की, यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे जो ऐतिहासिक दर कापसाला मिळत आहे, त्यामुळे भविष्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कधी नव्हे ती कापसाला (Cotton Rate) विक्रमी मागणी बघायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने आणि कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली असून कापसाला ऐतिहासिक विक्रमी दर मिळत आहे. कापसाच्या बाजार भावात रोजाना वाढ नमूद केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी थोड्या प्रमाणात का होईना समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. या हंगामात कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर प्राप्त झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील (Akola District) अकोट एपीएमसीमध्ये कापसाला हा ऐतिहासिक दर मिळाला असून यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. अकोट एपीएमसीमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून कापूस विक्रीसाठी दाखल होत असतो.

या एपीएमसीमध्ये प्रामुख्याने नांदेड, परभणी, वाशिम, बुलडाणा, अमरावती या विदर्भातील जिल्ह्याचा कापूस विक्रीसाठी आणला जात असतो. खरं पाहता, यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला होता.

खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच बदललेल्या वातावरणामुळे कापूस पिकावर संपूर्ण हंगामभर बोंड अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळाला. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली, कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याने प्रारंभी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता.

मात्र, मध्यंतरी कापसाची मागणी वाढल्याने कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आणि आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला ऐतिहासिक बाजारभाव मिळाला असल्याने कापुस उत्पादक शेतकरी सुखाने पहुडला आहे. शेतकऱ्यांना आगामी हंगामात देखील विक्रमी दर मिळण्याची आशा असून येत्या खरीपात कापसाचे क्षेत्र लक्षणीय वाढण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe