IMD Alert : ‘या’ राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

IMD Alert : देशात पावसाळ्याचे दिवस संपून हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. परंतु, अजूनही काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे हवामान पाहूनच घराबाहेर पडा. पुढील काही दिवसांत देशातील अनेक भागात तापमानात अचानक घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आजही गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतांवर बर्फवृष्टीसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात स्पष्टपणे दिसून येतोय. दिल्ली-एनसीआर, उत्तर, मध्य भारतासह देशातील अनेक भागांमध्ये तापमानात घट होत आहे. त्यामुळे पर्वतीय भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढू शकते.

पुढच्या आठवड्यात दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये थंडीची लाट येऊ शकते असे एमआयडीचे म्हणणे आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, अंदमान आणि निकोबार या राज्यांमध्ये पुढचे काही दिवस हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात अनेक दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागात तापमान कमी झाले आहे.दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते.

आज आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. हे क्षेत्र पश्चिम-वायव्येकडे सरकून केंद्रित होण्याची दाट शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासांत दाब निर्माण होईल. त्यानंतर ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकून 8 डिसेंबर रोजी तामिळनाडू-पुडुचेरी किनार्‍याजवळ पोहोचू शकते.

अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच दक्षिण अंदमान समुद्रात समुद्राची स्थिती खडबडीत असेल. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास असू शकतो, तो सुमारे 60 किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो.

तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटने वर्तवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe