अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने राज्यातील अनेक धरण साठ्यात पाण्याची मोठी आवक निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी धरणे, नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे.
यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरली आहे.
…ही’ 11 धरणे झाले ओव्हरफ्लो मुसळधार पावसामुळे भीमा खोर्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, नीरा देवघर, भाटघर, वडज, कळमोडी, चासकमान, आंद्रा, पवना ही ११ धरणे १०० टक्के भरली असून या धरणांमधून नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
या धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी शेवटी उजनी धरणात येत असते. जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यात वाढ झाल्यास भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उजनी धरणातील,पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत उजनी धरणात ६७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय.
तसेच पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या सततच्या पावसाने राज्यातील अनेक ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम