Budget Smartphones : हे आहेत तुमच्या बजेटमधील जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि बरेच काही..

Ahmednagarlive24 office
Published:

Budget Smartphones : अनेक दिग्ग्ज टेक कंपन्या मार्केटमध्ये आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असतात. ग्राहकही शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन आला की तो खरेदी करतात. त्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे हे फोन विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

परंतु, तुम्ही आता कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. सर्वात म्हणजे यात 6000mAh ची दमदार बॅटरी आणि इतर स्पेसिफिकेशन दिले जात आहे. हे फोन कोणते आहेत पाहुयात त्यांची सविस्तर माहिती..

1. Poco C50

Poco चा हा स्मार्टफोन 6,499 रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही हा फोन कोटक बँक क्रेडिट आणि क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांद्वारे घेतला तर 10 टक्के (रु. 750 पर्यंत) सूट मिळेल. यावर 5,950 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत असून यात 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे.

ते नंतर मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. 8 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर आणि 4 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. याचा 6.52 इंच डिस्प्ले आहे. 5000mAh बॅटरी आहे. हँडसेटमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर उपलब्ध आहे.

2. Samsung Galaxy F04

सॅमसंगच्या या स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपये आहे. यावर तुम्हाला कोटक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनद्वारे 750 रुपयांपर्यंतच्या सूटवर घेता येईल. 7,800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले जात आहे.

नंतर ते मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. 6.5 इंचाचा HD डिस्प्ले असून 13 मेगापिक्सल्सचे प्राथमिक आणि 2 मेगापिक्सल्सचे दोन सेन्सर आहेत. 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीकडून यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह येतो.

3. Redmi 10

हा फोन कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे 10 टक्के सवलतीत मिळू शकतो. यावर 9,450 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. स्टोरेजचा विचार केला तर या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे.

नंतर ते मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येते.यात 6.7 इंच HD+ डिस्प्ले दिला असून हा 50-मेगापिक्सलचा प्राथमिक रियर कॅमेरा सेटअपसह येतो. 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह येतो.

4. Realme C30

हा फोन 5,749 रुपयांसाठी Flipkart वर सूचीबद्ध आहे. यावर 5,200 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून स्टोरेजचा विचार केला तर 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येते. यात 6.5 इंच HD+ डिस्प्ले दिला आहे. 8 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 5000mAh बॅटरी दिली आहे. फोन Unisoc T612 प्रोसेसरसह येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe