अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story :- हिरवीगार शेतं, विविध प्रकारच्या भाज्या, रोपवाटिका, गायी आणि वासरे, शेळ्या, उंट आणि मातीची घरे. जयपूरच्या खोरा श्यामदास गावातील हे दृश्य आहे.
येथे तुम्ही हिरवळ पाहण्यासोबतच बागकाम शिकण्यासोबतच उंटाच्या सवारीचा देखील आनंद घेऊ शकता. गावात फेरफटका मारता येईल. मातीच्या घरात रात्र काढता येईल.

यासोबतच मातीच्या चुलीवर बनवलेल्या जेवणाचा देखील आस्वाद घेता येईल. मित्रांनो या मॉडेलला कृषी पर्यटन इंग्रजीत त्याला ऍग्रो टूरिज्म (Agro Tourism) म्हणतात.
याचं कृषी पर्यटनची सुरुवात करून राजस्थानमधील दोन मित्रानी शेतीत (Farming) एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. राजस्थान मधील रहिवासी इंद्रराज जाट आणि सीमा सैनी यांनी ही किमया साधली आहे.
मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की या दोघांनी 4 एकर जमिनीवर एकात्मिक शेती (Integrated farming) आणि कृषी-पर्यटन मॉडेल विकसित केले आहे.
यातून हे दोघेही तब्बल वर्षाकाठी 35 लाख रुपयांचा व्यवसाय करत आहेत. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या स्तरावर रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
लहानपणापासून शेतीची आवड
इंद्रराज हा मूळचा जयपूरचा रहिवासी आहे, तर सीमा ही अजमेरची रहिवासी आहे. दोघांचीही शेतीची कौटुंबिक पार्श्वभूमी असून दोघांनीही कृषीमध्येच (Agriculture Sector) शिक्षण घेतले आहे.
इंद्रराजने 7-8 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी काम केले, तर सीमाने मास्टर्स केल्यानंतर लगेच शेती सुरु केली. इंद्रराजला अगदी लहानपणापासूनच शेतीची आवड होती.
मात्र शिक्षण पूर्ण करून त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, पण शेतीपासून स्वतःला कधीचं वेगळं केलं नाही. नोकरी सोडून शेतीलाच करिअर करावे, असा विचार तो नेहमी करत असे.
दरम्यान त्याची सीमा सैनी यांच्याशी ओळख झाली. तिला देखील शेतीतचं रस होता. म्हणून त्यांनी दोघांनी शेती करायचे ठरवले आणि 2017 मध्ये दोन गायी आणि भाजीपाला लागवड करून शेतीचा भन्नाट प्रवास सुरू केला.
इंटींग्रेटेड फार्मिंगकडे वाटचाल
इंद्रराज सांगतात की, शेतकरी कुटुंबातून असल्याने एक-दोन पिके घेऊन नफा कमावता येत नाही, ते त्यांना चांगलेचं ठाऊक होते.
वर्षभरात एका पेक्षा अधिक उत्पादन घेतले तर तेव्हाच शेतीत यशस्वी होता येऊ शकते असे त्यांना माहिती होते. या अनुषंगाने त्यांनी एकात्मिक शेतीवर काम करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांनी याची व्याप्ती अथवा विस्तार वाढवला. सुरवातीला भाजीपाला शेती केली नंतर त्यांनी स्वतः रोपवाटिका विकसित करण्यास सुरुवात केली.
वर्षभरानंतर त्यासाठी आवश्यक शेडचे काम पूर्ण झाले. यानंतर शेतीपूरक व्यवसाय कुक्कुटपालन व शेळीपालनावर भर देण्यात आला.
एवढेच नाही शेतीतुन प्राप्त झालेल्या शेतमालावर आधारीत विविध प्रकारची उत्पादने बनवून त्यांनी मार्केटिंग सुरू केले. पशुपालन करत असल्याने मोठ्या प्रमाणात शेणखत त्यांच्याकडे जमा होऊ लागले, तेव्हा त्यांनी यावर उपाय म्हणुन वर्मी कंपोस्ट तयार करण्यास सुरुवात केली, जेणेकरून शेतीसाठी बाहेरून खत विकत घ्यावे लागू नये.
एकात्मिक शेती आहे तरी काय
एकात्मिक शेती हा बहुविध शेतीचा एक प्रगत प्रकार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने शेती करायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे.
यामध्ये एकाच वेळी अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते शिवाय शेतीशी निगडीत आणि एकमेकांना पूरक अशा व्यवसायाचा देखील यात समावेश करण्यात येतो.
त्यात रोपवाटिका, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मशरूम लागवड यासारख्या गोष्टींचा समावेश असतो.
शेतकऱ्यांसाठी घर बांधले, नंतर त्याचे कृषी पर्यटनात रूपांतर केले
इंद्रराज सांगतात की, जेव्हा त्यांनी एकात्मिक शेती करायला सुरुवात केली तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी त्याच्या या शेतीमध्ये रस दाखवला. मग त्यांनी त्यांच्या शेताजवळ मातीचे घर बांधले आणि तेथील शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
हळूहळू शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. आता शेतकऱ्यांच्या राहण्यासाठी जागेची कमतरता भासत होती. शिवाय त्यांचे शेतीतील हे मॉडेल पाहणाऱ्यांची संख्याही वाढत होती.
शिवाय पक्की घरं बांधली असती तर जास्त पैसे लागले असते. त्यामुळे त्यांनी मातीची घरे बांधण्याचा आग्रह धरला. यामुळे इथे येणाऱ्या लोकांना हे विशेष आवडले.
इंद्रराज सांगतात की, जे लोक त्यांचे मॉडेल पाहायला यायचे, त्यांना खूप मजा यायची. बरेच दिवस त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत येथे वास्तव्य केले आणि चुलीवरील स्वयंपाक चाखला.
येथे त्यांचे मॉडेल पाहण्यासाठी येणारे लोक त्यांच्याकडून भाजीपाला, शेवया कंपोस्ट आणि इतर पदार्थ विकत घेऊन जातात.
आता या ठिकाणी लोकांना स्विमिंग, उंटाची सवारी, पुरवली जातं आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या शेतीचे कृषी पर्यटनात रूपांतर केले आहे आणि यातून ते आता लाखों रुपयांची उलाढाल करत आहेत.