Hero Upcoming Bike : शानदार मायलेजसह लवकरच लॉन्च होणार हिरोची जबरदस्त बाईक, Honda Shine ला देणार टक्कर

Ahmednagarlive24 office
Published:

Hero Upcoming Bike : सध्या देशात पेट्रोल महाग झाल्याने ग्राहक कोणतीही बाईक खरेदी करण्यापूर्वी अगोदर तिचे मायलेज पाहतात. ज्या बाईकचे मायलेज उत्तम ती खरेदी करतात. अशातच जर तुम्ही शानदार मायलेज असणारी बाईक खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कारण शानदार मायलेजसह लवकरच हिरोची जबरदस्त बाईक लॉन्च होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही बाईक Honda Shine ला टक्कर देईल. परंतु खरेदीसाठी तुम्हाला काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. जाणून घेऊयात बाईकचे फीचर्स आणि किंमत

कसे आहे नवीन बाईकचे इंजिन

नवीन हिरो बाईकमध्ये 110 सीसी सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिनद्वारे देण्यात आले आहे जे 7000rpm वर एकूण 8bhp आणि 5500rpm वर 9Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही बाईक 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आलेली आहे. परंतु या नवीन बाईकच्या लॉन्चची तारीख अजूनही कंपनीने जाहीर केली नाही.

जाणून घ्या किंमत

किमतीबाबत बोलायचे झाले तर अजूनही कंपनी या बाइकची किंमत जाहीर करण्यात आली नाही. परंतु असे मानण्यात येत आहे की कंपनी या बाईकला 80 ते 85 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.

तसेच ही बाईक TVS Star City, Honda Sign 100 यांसारख्या शानदार बाईकल टक्कर देऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम बाईक घेण्याचा विचार करत असल्यास कंपनीची आगामी बाइक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. तसेच या बाईकच्या लॉन्चसोबतच, कंपनीशी निगडित बँक तुम्हाला एक उत्तम फायनान्स प्लॅन देईल, याच्या मदतीने तुम्ही ती खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe