अरे बापरे: एकाच दिवशी सात बंगले फोडले..! लाखो रुपयांचे दागिने लंपास

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर

येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख रक्कमेसह एक लॅपटॉप चोरुन नेले आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवरानगर येथील प्रवरा डावा कॅनॉलच्याकडेला असणाऱ्या कारखाना परिसरातील ‘ए’ टाइप व ‘बी’ टाईप कॉलनी मधील सहा ते सात बंगल्यांची कडी व कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनीएकाच दिवशी घरातील कपाटाच्या उचकापाचक करून रोख रक्कम,

सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चोरीच्या घटनेमुळे प्रवरानगर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी बंद असलेले बंगले फोडले असून

चोरी झालेल्या रात्री बंगल्यात कुणीही नसल्यामुळे त्याचा फायदा घेत चोरट्यांनी पाळत ठेवून सहा ते सात बंगल्यात चोरी केली. सुट्टी असल्यामुळे तेथील अनेक जण गावी गेली असल्यामुळे हे बंगले फोडले.

सकाळी चोरीचा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. तरी पोलीसांनी चोरीचा तातडीने तपास लावुन चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe