अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनची जवळपास तयारी पूर्ण झाली असून, सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे.
लीगमध्ये सहभागी झालेल्या अहमदाबाद आणि लखनौ या नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली असून, यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मोठी नावे ऑक्शनमध्ये दिसणार नाहीत. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावासाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने नाव नोंदवलेले नाही.
१२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे हा लिलाव होणार आहे. यंदापासून आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, या आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल हे दोन २०-२० चे सुपरस्टार दिसणार नाही.
एबीने मागच्याच महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात आज गेलनंही हा निर्णय घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत.
यामध्ये २७० खेळाडू यांनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर ९०३ खेळाडू अनकॅप आणि ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेतील आहेत. पण, नोंदणी केलेल्या या खेळाडूंमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच्यासह मिचेल स्टार्क,
सॅम करन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स या स्टार्सची नावे नसून, आयपीएल २०२२ मध्ये हे खेळाडू खेळताना दिसणार नाही. ‘हे’ क्रिकेटर्स नाही खेळणार, मेगा ऑक्शनमध्ये नाव नाही दिलेले खेळाडू पुढीलप्रमाणे-
१) ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणार ख्रिस गेल यंदाच्या ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाही. धडाकेबाज फलंदाजीसाठी ख्रिस गेल ओळखला जात असून गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4965 धावा केल्या आहे. मेगा ऑक्शन आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी रिलीज केले आहे.
२) राजस्थान रॉयल्सचे स्टार खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे सुद्धा यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाहीत. दुखापतीचा धोका असल्यामुळे इंग्लंडच्या दोन्ही खेळाडुंनी आपले नाव मागे घेतले आहे. दोन्ही खेळाडुंनी मागच्या सीजनमध्ये राजस्थानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
३) चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणारा सॅम करण आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणारा ख्रिस वोक्स यांनी सुद्धा आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलाय. करणला मागच्या सीजनमध्ये मध्यावरच आयपीएल सोडून मायदेशी परताव लागले होते. कारण तो दुखापतग्रस्त झाला होता. दोघे का सहभागी होत नाहीयत, ते कारण अजून समोर आलेलं नाही.
४) कोलकाता नाइट रायडर्स साठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाही. मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळला आहे. त्याची इकोनॉमी 7.17 असून 17.06 च्या स्ट्राइकने 34 विकेट काढल्यात. शिवाय तो याआधी आरसीबीसाठी सुद्धा खेळला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम