सावरकर जयंतीला हिंदू महासंघाची शपथ, फक्त अशाच दुकानांतून खरेदी…

Published on -

Maharashtra news : सावरकर जयंतीच्यानिमित्ताने पुण्यात हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळीच शपथ घेतली. “मी माझ्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू हिंदू धर्माचा आदर करणाऱ्या बांधवांकडूनच घेईन,” अशी शपथ घेण्यात आली.

हिंदू महासंघाकडून संबंधित व्यापाऱ्यांच्या दुकानावर भगव्या रंगाचे स्टीकर लावले जाईल. जेणेकरून हिंदू धर्माचा सन्मान करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने ओळखणे सोपे जाईल.याशिवाय इतर लोकांनीही केवळ हिंदू धर्माचा सन्मान असणाऱ्या व्यावसयिकांकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहनही हिंदू महासंघाकडून करण्यात आले.

सावरकर जयंतीनिमित्त पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील वीर सावरकर यांचे वास्तव्य असलेली खोली उघडण्यात आली होती. पुण्यातील सावकरप्रेमी याठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यासाठी जमतात. याचे औचित्य साधून ही शपथ घेण्यात आली. आधीच राज्यातील धार्मिक वातावरण बिघडेले असताना या शपथेमुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe