हिंदूराष्ट्र सेनेने नेहमीच दीन-दुबळयांना मदतीचा हात दिला -अभिषेक कळमकर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- हिंदूराष्ट्र सेनेने नेहमीच दीन-दुबळयांना मदतीचा हात दिला आहे. हिंदूत्वाने भारावलेले युवक जनसामान्यांसाठी सामाजिक उपक्रम राबवित असून, युवकांची ही चळवळ प्रेरणादायी आहे. गणेशोत्सव काळात युवकांनी एकत्र येऊन राबविलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे. नुकतेच हिंदूराष्ट्र सेनेच्या युवकांनी गांधी मैदान येथे भाविकांना प्रसाद वाटप करुन अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड व माजी महापौर कळमकर यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी कळमकर बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक पै. सुभाष लोंढे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, अजय चितळे, प्रदीपभैय्या परदेशी, दिनेश लोंढे, रविभाऊ दंडी, हिंदुराष्ट्र सेना जिल्हाप्रमुख परेश (महाराज) खराडे,

स्वप्निल लाहोर, सूरज गोंधळी, अभिजीत भगत, राहुल रोहकले, घनशाम बोडके, रोहन चव्हाण, प्रशांत भंडारी, सौरभ चौरे, किरण रोकडे, सचिन वाळके, राकेश गलपेल्ली, दिनेश हिरगुडे, वरूण शेळके, सागर ढुमणे, केशव मोकाटे, रवी सग्गम, सनी परदेशी, संदेश पानसरे, कृष्णा सूर्यवंशी आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्रम राठोड म्हणाले की, शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाला अनेक मंडळांनी सामाजिक कार्याची जोड दिली आहे.

गणेशोत्सवात हिंदूराष्ट्र सेनेने इतर खर्च टाळून अनामप्रेम मध्ये घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून, हिंदूत्वाचे विचार घेऊन युवक समाजात कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

परेश (महाराज) खराडे यांनी युवकांना एकत्र करुन समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हिंदूराष्ट्र कटिबध्द असून, हिंदूत्वाच्या विचाराने युवक कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe