नवी दिल्ली : मी हिंदू (Hindu) आहे, हिंदू लोक बीफ (Beef) खातात, त्यामुळे मी देखील खाऊ शकतो असे व्यक्तव्य कर्नाटकातील (Karnataka) विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddharamayya) यांनी केले आहे.
“मी हिंदू आहे आणि अजून बीफ खाल्ले नाही. पण हवे असल्यास आपण बीफ खाऊ शकतो. ही आपली मर्जी आहे. आरएसएस (RSS) लोकांमध्ये भेद निर्माण करत आहे,” असा आरोपही काँग्रेस (Congress) नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.

सिद्धरामय्या यांनी बीफ संदर्भात केलेल्या वक्तव्यनंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. “सिद्धरामय्या तुमकुरूमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी यावर वक्तव्य केले आहे. संघाचे लोक सुमदायांमध्ये भेद निर्माण करत आहेत. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे लोक नसतात,” असेही सिद्धरामय्या म्हणाले आहेत.
सिद्धरामय्या नक्की काय म्हणाले?
“मी हिंदू आहे. परंतु मी आतापर्यंत बीफ खाल्लेलं नाही. परंतु मला वाटल्यास मी ते खाऊ शकतो. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असा सवालही त्यांनी केला. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे नसतात. हिंदूही बीफ खातात, ख्रिस्तीही (Christians) खातात.
इतकंच नाही तर मी एकदा कर्नाटक विधानसभेतही म्हटलं होतं की मी बीफ खावं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? हे खाण्याच्या आवडीशी जोडलेला विषय आहे आणि तो आपला अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.