अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :- राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात मंत्री महोदय धन्यता मानत आहे. राहुरी नगरपालिकेची दुसरी पाणीपुरवठा योजना अजुन पर्यत राहुरी शहराला मिळाली नाही.
मी आमदार असतांना 27 कोटी रूपयांची नवीन पाणी योजनेला मंजुरी आणली. पाणी योजनेचे श्रेय मला मिळू नये यासाठी मंत्री महोदयांनी ही योजना होऊ दिली नसल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केला आहे.
कर्डिले नागरदेवळे (ता. नगर) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, त्यांनी 50 वर्षात नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून राहुरी शहरासाठी काय दिवे लावले, आजही राहुरीमध्ये पाणी, अस्वच्छता, शौचालयच, रस्ते, आरोग्य आदी प्रश्न जनतेसमोर उभे आहेत.
मंत्री महोदय स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी नागरदेवळे ग्रामपंचायत ऐवजी नगरपरिषद करण्याचे स्वप्न रंगवत आहेत. जनतेने मंत्री महोदयांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचे अवस्था काय आहे, हे आदी पाहून यावे मग नगरपरिषदेचे स्वप्न पहावे.
गेली 20 वर्षात नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या परिसरामध्ये भरी विकास कामे केली असल्याचा दावा कर्डिले यांनी यावेळी केला.
ते सदस्य वॉचमेनच्या भूमिकेत नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे कार्यालय उघडायला आणि बंद करायला जाऊन वॉचमेनची भूमिका पार पाडत आहे.
टक्केवारीच्या माध्यमातून जिल्हा परिषदमध्ये लाचारी पत्करत आहे. पंचायत समितीचा कारभार, ग्रामसेवकांच्या बदल्या पैसे घेऊन करण्याचा उद्योग सुरू आहे.
तसेच नागरदेवळे परिसरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. परंतु काही समाजकंटक राजकीय हितासाठी जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा कर्डीले यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम