PPF : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशातच तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण ऐन महागाईच्या काळात तुमच्यासाठी सरकारची एक योजना वरदान ठरत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी असे या योजनेचे नाव आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कोणतीही जोखीम नसते तसेच तुम्हाला चांगला परतावा मिळतो. ही एक लोकप्रिय योजना आहे. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. मुदतपूर्तीच्या वेळी तुम्ही 40.68 लाख रुपये गोळा करू शकता.


तुम्हाला सरकारच्या PPF या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येत आहे. या योजनेत कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजने 7.1 टक्के इतके व्याज मिळत आहे.

सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरावर आधारित, जर तुम्ही प्रत्येक वर्षी 1,50,000 रुपये या योजनेत गुंतवले तर तुमची प्रत्येक महिन्याला 12,500 रुपयांची बचत होईल.

15 वर्षांनी म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्ही एकूण 40,68,209 रुपये जमा करू शकाल. हे लक्षात ठेवा गुंतवणुकीच्या कालावधीत तुम्हाला एकूण रु. 22,50,000 ची गुंतवणूक करावी लागणार आहे. तरच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 18,18,209 रुपये व्याज दिले जाईल.

15 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 40,68,209 रुपये असणार आहेत. या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे भविष्याशी निगडित उद्दिष्टे पूर्ण करू शकता.













