Holi Special Tips : होळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. रंगाचा उत्सव असलेला हा सण प्रत्येक ठिकाणी वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
होळीच्या दिवशी प्रत्येकाला रंग आणि पाण्याने होळी खेळायला आवडते. मात्र या मौज-मजेत लोक त्यांच्या सोबत असलेल्या फोनची काळजी घेणे विसरतात.

त्यामुळे फोनमध्ये पाणी जाते किंवा फोन रंगामुळे खराब होतो. तुमचा मौल्यवान फोन सुरक्षित राहावा यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.
वॉटरप्रूफ कव्हरचा वापर करा – होळीच्या दिवशी तुमचा फोन बाजारात उपलब्ध असलेल्या वॉटरप्रूफ कव्हरमध्ये ठेवा. वॉटरप्रूफ कव्हर पाण्यापासून तुमच्या फोनचे योग्य प्रकारे संरक्षण करेल आणि फोन खराब देखील होणार नाही.
फोनमध्ये पाणी गेल्यास कॉल रिसिव्ह करू नका – काही कारणाने फोनमध्ये पाणी गेल्यास कॉल रिसिव्ह करू नका आणि कॉल डायल करू नका. फोन बंद करा आणि बॅटरी काढा आणि स्वच्छ सुती कापडाने पुसून टाका.
फोन पुसल्यानंतर तो तांदळाच्या डब्याच्या मधोमध ठेवा. १२ तासांनंतर फोन बाहेर काढा. यामुळे फोनमधील ओलावा नाहीसा होईल.
इअरफोन-ब्लूटूथ सोबत कॅरी करा – इअरफोन किंवा ब्लूटूथ नक्कीच सोबत कॅरी करा : होळीच्या दिवशी फोन घेऊन बाहेर जात असाल तर इअरफोन किंवा ब्लूटूथ नक्कीच सोबत घ्या.
यामुळे तुम्हाला फोनवर बोलणे सोपे होईल. खूपच महत्वाचे काम असल्यास होळी खेळतानाही तुम्हाला तुमचा फोन सोबत ठेवायचा असेल तर त्यासाठी झिप पाउच वापर करा.
स्पीकरवर बोलण्याचा प्रयत्न करा स्पीकरवर बोलण्याचा प्रयत्न करा: जर तुम्हाला एखादा महत्वाचा फोन आला किंवा कोणाला फोन करायचा असेल
आणि रंग खेळून तुमचे डोके ओले झाले असेल तर फोन करताना स्पीकरवर बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोक्यातील पाणी मोबाईल फोनमध्ये गेले तर फोन बंद होऊ शकतो आणि खराब देखील होऊ शकतो.