Honda Activa : पेट्रोलला करा बाय बाय ! आता जुनी Honda Activa होणार इलेक्ट्रिक; जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Honda Activa : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या (Fuel Rates) वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) आणि कार बाजारात येईला लागल्या आहेत. आता जुनी Honda Activa ही इलेक्ट्रिक बनवता येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी, ही मागणी पाहता, काही काळापूर्वी बातमी समोर आली होती की होंडा आपल्या सर्वात लोकप्रिय मॉडेल Honda Activa सह भारतातील EV स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करेल.

तथापि, Honda Activa ला इलेक्ट्रिक व्हर्जन (Activa with battery) वर जाण्यासाठी काही वेळ लागू शकतो. पण, तुमच्याकडे जुनी अ‍ॅक्टिव्हा असेल, तर त्यासाठी ईव्ही कन्व्हर्जन किट बाजारात आणण्यात आले आहे,

ज्यामुळे होंडा अ‍ॅक्टिव्हा ग्राहकांच्या पेट्रोलची किंमत ‘0’ असेल. या किटची किंमत किती आहे आणि हे इन्स्टॉल केल्यावर, एका चार्जवर किती रेंज उपलब्ध होईल हे जाणून घेऊया.

होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक

बाजारात अनेक दुचाकींसाठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला GoGoA1 इलेक्ट्रिक किटबद्दल सांगणार आहोत. या कंपनीने नुकतेच Hero Splendor आणि Bajaj Avenger बाइक्ससाठी रूपांतरण किट सादर केले. त्याच वेळी, आता ही महाराष्ट्रस्थित कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हासाठी इलेक्ट्रिक किट देखील उपलब्ध करून देत आहे.

Honda Activa साठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट (Electric conversion kit) कंपनीच्या अधिकृत साइटवर हायब्रीड फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. या किटची किंमत 18,330 रुपये आहे. परंतु, तुम्ही ते विकत घेतल्यास, जीएसटी आणि शिपिंग शुल्क जोडल्यानंतर ते सुमारे 23,000 रुपये होईल.

जुनी अ‍ॅक्टिव्हा होणार इलेक्ट्रिक

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती Honda Activa च्या जुन्या मॉडेलमध्ये बसवता येते. कंपनीने साइटवर माहिती दिली आहे की, हे किट खास जुन्या अ‍ॅक्टिव्हासाठी सादर करण्यात आले आहे.

याचा अर्थ असा की तुम्ही ते नवीनतम Activa 6G मध्ये इंस्टॉल करू शकत नाही. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर करू शकता आणि ते तुमच्या घरी पोहोचवू शकता.

GoGoA1 इलेक्ट्रिक स्कूटर किटमध्ये 60V आणि 1200W उच्च कार्यक्षमतेची BLDC हब मोटर रीजनरेटिंग सिन वेब कंट्रोल आणि रिस्ट थ्रॉटल मिळेल.

किटमध्ये बॅटरी नसेल

तुम्ही हे रूपांतरण किट तुमच्या स्थानिक मेकॅनिककडे सहज स्थापित करू शकता. या किटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरसह इतर सर्व आवश्यक घटक मिळतील. मात्र, तुम्हाला स्कूटरची बॅटरी बाहेरून खरेदी करावी लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe