Honda Car Offer : 27 मायलेज असणाऱ्या ‘या’ कारवर मिळेल बंपर डिस्काउंट, लगेचच करा खरेदी

Ahmednagarlive24 office
Published:
Honda Car Offer

Honda Car Offer : तुम्ही आता खूप कमी किमतीत 27 मायलेज असणारी कार खरेदी करू शकता. होंडा अशी ऑफर देत आहे. तुम्ही कंपनीच्या दोन सेडान कार कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

स्वस्तात खरेदी करता येईल Honda City 5th Generation आणि Amaze

ऑफरबद्दल बोलायचे झाले तर आता तुम्ही Honda City 5th Generation आणि Amaze 31 ऑक्टोबरपर्यंत कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनी या दोन मॉडेल्सवर फायदे देत असून यात कॅशबॅक, मोफत अॅक्सेसरीज, लॉयल्टी आणि एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे.

होंडा सिटी ऑफर

होंडा सिटीच्या ग्राहकांना या महिन्यात सर्वात जास्त फायदा होईल. कंपनीने असे सांगितले आहे की, सिटी फिफ्थ जनरेशन सेडानच्या नवीन ग्राहकांना, ज्याची किंमत ₹11.63 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तसेच त्यांना 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा 26,947 रुपयांपर्यंतच्या मोफत अॅक्सेसरीज मिळतील.

तसेच तुम्हाला या कारवर 4,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळेल. तसेच तुम्हाला या होंडा कारवर एक्सचेंज ऑफर मिळेल. समजा तुमच्याकडे जुनी Honda कार असेल आणि त्याला ती नवीन सिटीसोबत बदलायची असल्यास कंपनीकडून तुम्हाला 6,000 रुपयांची सवलत मिळेल. तसेच इतर कारसाठी एक्सचेंज फायदे 15,000 रुपयांपर्यंत आहेत. यावर दोन कॉर्पोरेट सूट पॅकेजेस उपलब्ध असून यावर मानक सवलत 5,000 रुपयांची आहे, विशेष कॉर्पोरेट सूट 20,000 रुपयांपर्यंत किमतीचे फायदे मिळतील.

Honda Amaze ऑफर

Honda Amaze sedan तुम्ही 57,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह खरेदी करता येईल. या वर्षी उत्पादित अमेझ सेडानवर कार निर्माता रोख आणि कॉर्पोरेट सवलत तसेच लॉयल्टी बोनस मिळेल. जुन्या मॉडेल्सवर तुम्हाला विशेष कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस मिळेल.

या महिन्यामध्ये तुम्हाला Amaze वर 15,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. रोख सवलतीऐवजी 18,147 किमतीच्या मोफत अॅक्सेसरीज मिळेल. लॉयल्टी बोनस 4,000 रुपयांचा आहे, कॉर्पोरेट सूट अतिरिक्त 3,000 रुपये वाचवेल. विशेष कॉर्पोरेट सवलत 20,000रुपयांची असून एखाद्याला नवीन अमेझसाठी जुनी कार बदलायची असल्यास Honda 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe