Honda Electric Scooter : देशात अजूनही इंधनाच्या किमती कमी झाल्या नाहीत. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर भर देत आहेत. अशातच आता होंडाने आपली नवीन EM 1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.
कंपनीची ही आगामी स्कुटर अवघ्या 6 तासांत पूर्ण चार्ज होते, कंपनीकडून ही स्कुटर 48km रेंज आणि 45km/h टॉप स्पीडसह लाँच करण्यात आली आहे. जर तुम्हाला नवीन स्कुटर खरेदी करायची असल्यास तुम्ही ही स्कुटर खरेदी करू शकता.

खासियत
सर्वात अगोदर हे समजून घ्या की ईएम म्हणजे या होंडा स्कूटरचे इलेक्ट्रिक मोपेड होय. यात कंपनीकडून इन-हाऊस लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, ज्याची क्षमता 1.47 kWh तसेच वजन 10.3 kg इतके आहे.
तसेच बॅटरी 1.7kW मोटरसह जोडण्यात आली आहे जी 90Nm पीक टॉर्क निर्माण करेल. तसेच ऑनबोर्ड बॅटरी 270 W AC चार्जर वापरून चार्ज करण्यात येते, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तासांपर्यंत वेळ लागतो.
जाणून घ्या फीचर्स
कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर टेलिस्कोपिक सस्पेंशन, ट्विन शॉक शोषक, कॉम्बी ब्रेकिंग, फ्रंट डिस्क ब्रेकिंग, रियर डिस्क ब्रेकिंग, 12-इंच फ्रंट व्हील, 10-इंच मागील चाक अशा अनेक शानदार फिचरसह सुसज्ज असणार आहे.
रेंज आणि स्पीड
ही स्कुटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर सहज 48 किमीचे अंतर सहज पार करेल, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच ते वेगाच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. ज्याचा टॉप स्पीड 45 किमी/तास इतका आहे.
किती असेल किंमत?
नुकतीच ही इलेक्ट्रिक स्कूटर युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.परंतु कंपनीने अजूनही या स्कुटरची किंमत जाहीर केली नाही. ही स्कुटर तीन- ब्लॅक, सिल्व्हर आणि व्हाईट कलर अशा पर्यायांमध्ये सादर केली जाणार आहे. भारतीय बाजारपेठेत ही स्कुटर केव्हा लॉन्च होईल याची अधिकृतपणे माहिती अद्याप दिली नाही, मात्र या वर्षाच्या अखेरीस ती भारतीय बाजारपेठेत दाखल होईल.