Honda Diesel Cars in India : होंडाने ग्राहकांना दिला मोठा धक्का! बंद केली सर्वात स्वस्त कार

Ahmednagarlive24 office
Published:

Honda Diesel Cars in India : होंडाच्या अनेक कार मार्केटमध्ये चांगला धुमाकूळ घालत असतात. कंपनी सतत नवनवीन कारही लाँच करत असते. अशातच कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे.

कारण कंपनीने सर्वात स्वस्त डिझेल कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीच्या इतर कारही बंद होणार आहेत. कार बंद करण्यामागचे कारण काय ते जाणून घेऊयात.

कार बंद करण्यामागचे कारण आले समोर 

एप्रिल 2023 पासून भारतात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) हा नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपनीने अमेझचे डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन उत्सर्जन मानदंड पूर्ण करण्यासाठी डिझेल इंजिन अपग्रेड करावे लागणार असून ते खूप महाग आहे. तसेच या सेगमेन्टमध्ये डिझेलची मागणीही खूप कमी होती.

आणखी मॉडेल्स बंद होणार?

भारतात होंडाची आणखी दोन डिझेल मॉडेल्स Honda WR-V आणि 5th gen City आहेत. या दोन्हीही कार लवकरच बंद केल्या जाणार आहेत. कंपनी फेब्रुवारी 2023 पासून डिझेल इंजिनचे उत्पादन बंद करेल. हे लक्षात घ्या की कंपनीची आता Honda Amaze फक्त 1.2-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असणार आहे. या कारची किंमत 6.89 लाख ते 9.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) दरम्यान आहे.

कंपनीने अगोदर 1.5-लिटर डिझेल इंजिन अमेझ सह भारतात सादर केले होते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 100hp आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या कारला CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय कंपनीने दिला आहे.

यामुळे अमेझ ही त्याच्या विभागातील एकमेव डिझेल ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट सेडान बनली. दरम्यान कंपनी आता एका एसयूव्हीवर काम करत असून त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. Honda SUV 2023 च्या सणासुदीच्या हंगामात बाजारात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe