शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान 

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्रांचा सन्मान  अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम  श्रीगोंदा = भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम

यांचे प्रेरणेने काम काम करणाऱ्या अग्नीपंख फौंडेशनने शासकीय सेवेत निवड झालेल्या भुमिपुत्र तसेच नवोदित खेळाडू, बॅक अधिकारी  यांचा गौरव केला आणि त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली.

हा सत्कार नगराध्यक्षा शुभांगी पोटे व उपनगराध्यक्ष संग्राम घोडके अनिल ठवाळ प्रशांत गोरे यांचे हस्ते करण्यात आला यावेळी अग्नीपंख फौंडेशनचे विश्वस्त मोहनराव आढाव जालिंदर निंभोरे यांची कुकडी साखर कारखाना व प्रशांत दरेकर यांची नागवडे साखर कारखाना संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा होते.

नगराध्यक्षा शुभांगी पोटे म्हणाल्या अग्नीपंख फौंडेशन नेहमी समाजहिताचे उपक्रम राबवत यामधून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे ही चांगली बाब आहे.

उपनगराध्यक्ष संग्राम घोडके यांनी अग्नीपंखने राबविलेल्या घरकुल उपक्रम व रोहीत गोंडगे व अदित्य शिंदे या खेळाडूंना आर्थीक मदत केली याचे कौतुक केले यावेळी प्रशांत दरेकर अनील ठवाळ मोहन आढाव प्रशांत गोरे यांचीही भाषणे झाली प्रास्ताविक विशाल चव्हाण यांनी केले

सुत्रसंचलन प्रतिभा भोसले हीने केले  आभार मधुकर काळाणे यांनी मानले यावेळी शिवदास शिंदे संतोष धुमाळ शितल धुमाळ उपस्थित होते.

चौकट  गौरवमुर्ती अभिषेक वाळके( वायुसेना वैमानिक) प्रमोद ढोरजकर( मुख्याधिकारी न. पा. ) राणी सोनवणे( आर टी ओ) रोहीत गोंडगे अदित्य शिंदे (खेळाडू) रोहीत काकडे(बॅक अधिकारी) राहुल घोलप संतोष धालवडे

गणेश कंगणे किरण धेंडे गणेश चव्हाण हर्षदा दुधाणे ज्ञानेश्वर दांगडे गणेश लगड महादेव टकले नवनाथ काटे प्रतिभा भोसले वैशाली लोखंडे

गौतम बिटके विशाल म्हस्के ऋषीकेश घोडके किर्ती मेहत्रे रविदास बिटके प्रियंका नेटके सतिश बिटके स्वप्नील जाधव तौसिफ पठाण (सर्व पोलिस काॅस्टेबल) संतोष धुमाळ व शितल धुमाळ( प्रशिक्षक)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe