बागायत पट्टयातील शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकी सर्वाधिक; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात वीज बिल प्रश्न आता चांगलाच तापला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी आजून चालूच आहे. त्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलनेही होता आहेत.

तर राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा ऊस पट्टयाचा भाग म्हणून ओळखला जातो.तर ह्या भागातील शेतकऱ्यांची स्थिती चांगली असून पैसे भरू शकत असताना देखील याच ठिकाणी मोठी थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

काही भागत अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी यांनी वीजबिल भरली आहेत. मात्र काही भागात राजकीय वरदहस्त असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून भरलेलीच नाही.

त्याची आकडेवारी ही आता समोर आली आहे. महावितरणने कृषी पंपाची थकीत वीज बिल योजना राबवली असली तरी याकडे काही भागात शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.आता महावितरण पुढे काय कारवाई करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe