अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कोल्हपूरमधील साखर कारखान्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा नगर जिल्ह्याकडे वळवला आहे.
सोमय्या यांनी पारनेर साखर कारखाना विक्री घोटाळा चौकशी प्रकरणी कृती समितीच्यावतीने थेट ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.
कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी विविध प्रश्नांबाबात चर्चा करण्यासाठी आज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारनेर येथील क्रांती शुगर साखर कारखाना येथे भेट दिली .
यावेळी बोलताना सोमय्या यांनी म्हटले आहे की,“पारनेर साखर कारखान्यात पवारांचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आहेत.
ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे.
जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान यावेळी सोमय्या यांनी पारनेर येथील शेतकरी सदस्य, कामगार, ग्रामंस्थाशी संवाद साधला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून समोर आलेल्या बाबी समोर ठेवल्या. यावेळी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम