Spam Calls : तुमचा मोबाईल नंबर स्पॅमरपर्यंत कसा जातो? जाणून घ्या सविस्तर

Spam Calls : डिजिटल युगात अनेकांची फसवणूक होत आहे. स्पॅमर लोंकांना सहज त्यांच्या जाळ्यात ओडून लाखोंची रक्कम काढून घेतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे.

यापैकी काहींची रक्कम त्यांना मिळते परंतु, काहींना आर्थिक फटका सहन करावा लागतो. परंतु, अनेकांना हा पप्रश्न पडतो की त्यांचा नंबर हा स्पॅमरपर्यंत कसा जातो? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

तुमचा नंबर कोठे मिळतो?

तुमच्या स्मार्टफोनवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मेसेजमुळे तुमच्या वैयक्तिक डेटाला हानी पोहोचू शकते. असे झाल्यास तुमचे नाव, नंबर आणि वय यासारखी वैयक्तिक माहिती शेअर केली जाते. उदाहरणाद्वारे याबाबत सांगायचे झाले तर तुम्ही तुमचा फोन नंबर वेबसाइटवर इतर माहिती शेअर केली तर तेथे तुमची करण्यात येतात. केले जातात.

असे कॉल येण्याचे कारण काय?

अनेक वेळा तुम्हाला बँकेत विम्यासाठी किंवा कार्डसाठी अर्ज केला नसताना तुमचा नंबर स्पॅमर्सकडे कसा जातो? जर तुम्ही तुमचा नंबर कोणत्याही वेबसाइटवर शेअर केला असेल किंवा तुम्ही तुमचा नंबर कोणत्याही बँकेशी लिंक केला असेल तर तुमचा नंबर स्पॅमरपर्यंत जातो.

जर तुमच्या नंबरवर स्पॅम कॉल्स आणि मेसेज येऊ लागले तर तुमची फिशिंग किंवा फसवणुकीला बळी होण्याची शक्यता असते. जर तुम्ही या अमिषाला बळी पडला तर तुमच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम काढून घेतली जाते.

यापासून कसे वाचायचे?

जर तुम्हाला या फसवणुकीपासून वाचायचे असेल तर अशा गोष्टींपासून सावध राहा. नंबर कोणत्याही साइटवर शेअर करू नका. त्याचबरोबर तुमच्या स्मार्टफोनवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स किंवा मेसेजकडे लक्ष देऊ नका.यासाठी एक मार्ग आहे तुम्ही ट्रू कॉलिंग अॅप डाउनलोड करू शकता, या अपमुळे तुम्ही सहजपणे स्पॅम कॉल किंवा मेसेज वाचू शकता.