मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी आता थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोक्यांचा आरोप केला आहे. औरंगाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने घेतलेल्या जिल्हा मेळाव्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
ठाकरेंनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराकडून पैसे घेऊन जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री केल्याचा गंभीर आरोप भुमरेंनी केला आहे. मंत्री भुमरे म्हणाले, तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता.

खोके घेतल्याचा आरोप करता. मात्र आम्ही पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. तुम्ही शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराला जलसंधारण खातं दिलं. अपक्ष आमदाराला पालकमंत्री केलं, मात्र तुम्हाला पालकमंत्रीपदासाठी संदीपान भुमरे दिसला नाही.
मला असं खातं दिलं ज्याला आस्थापनाच नाही. विभागाला एक अधिकारी नव्हता. मी कुठं दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तर कुणी स्वागतालाही यायचं नाही. असं संदीपान भुमरे म्हणाले.