Tips and Tricks : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? जाणून घ्यायचे असेल तर फॉलो करा या स्टेप्स

Ahmednagarlive24 office
Published:

Tips and Tricks : आज जवळपास प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस सिलिंडर दिसून येतो. या एलपीजी गॅसमुळे अनेक कामे खूप सोपे झाले आहे. परंतु,अनेक वेळा असे होते की अचानक गॅस संपतो.

त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते. परंतु, तुम्ही आता घरच्या घरीच तुमच्या एलपीजी सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते जाणून घेऊ शकता.

तुम्ही आता ओल्या कपड्याची मदत LPG सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते जाणून घेऊ शकता. त्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

सगळ्यात अगोदर तुम्हाला ओले कापड घेऊन ते सिलेंडर झाकून ठेवावे लागेल. काही वेळानंतर तुम्हाला ते सिलेंडरवरून काढावे लागेल.

सिलेंडरचा एक मोठा भाग ओल्या कपड्याने बहुतेक पाणी शोषून घेईल. काही वेळाने सिलेंडरचा काही भाग रिकामा होईल.

तसेच गॅस असणाऱ्या भागांमध्ये ओलावा दिसून येईल. त्या ठिकाणी पाणी आटायला जास्त वेळ लागतो.

रिकामा असलेला भाग आतून गरम होतो. सिलिंडरच्या त्या भागातील पाणी लवकर सुकते. त्यामुळे तुम्हाला किती गॅस शिल्लक आहे ते समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe