मोदींचा पगार किती, त्यांचा खर्च कोण करत? मिळाली ही उत्तरे

Ahmednagarlive24 office
Published:

 India News:पंतप्रधान नरेंद मोदींच्या यांच्या आकर्षक जीवनशैलीचे सर्वांवाच कुतूहल असते. त्यांचा हा खर्च कोण करते? त्यांचा पगार किती असतो? असे प्रश्ननही लोकांना पडतात.

याची उत्तरे एकाने माहितीच्या अधिकारात मिळविली आहेत. पंतप्रधान पद भूषवणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण खर्च केंद्र सरकारजी जबाबदारी असते.

पण मोदी मात्र, स्वत:च्या पगारातून सर्व खर्च करतात, अशी माहिती उत्तरादाखल देण्यात आली आहे. गॅस सिलेंडरपासून धान्य, दूध, फळं, भाज्या इथपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तूंसाठी मोदी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करतात.

कपड्यांच्या खर्च देखील ते स्वत:च करतात, अशी माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांना दरमहा सुमारे १ लाख ६० हजार रुपये पगार मिळतो.

याशिवाय खर्च भत्ता ३००० रुपये आणि खासदार भत्ता ४५ हजार रुपये आहे. दैनंदिन २,००० रुपये म्हणजेच दरमहा ६१ हजार रुपये आहे. हे सर्व मिळून १,६०,००० लाख होतात. एवढा दरमहा पगार मोदींना मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe