Rahul Gandhi : राज्यात सत्ता बदल होणार हे भाजपकडून वारंवार सांगण्यात येत होते. भाजपच्या म्हणण्यानुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार घालवण्यासाठी भाजपने शिवसेनेतील एक अख्खा गटचं बाजूला केला आणि त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर ५० खोक्यांचा विषय सुरु झाला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची यात्रा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून प्रवास करत आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी शिंदे गटातील आमदारांना भाजपने किती पैसे दिले हे स्पष्टच सांगितले आहे.
राहुल गांधी म्हणाले, मला आता शिवसेनेचे एक आमदार भेटले. ते सांगत होते की, भाजप आणि शिंदेगटाने आमदारांना कसे फोडले ते. 50 कोटी रुपये देऊन आमदारांना फोडल्यांचे त्यांनी सांगितले.
त्या आमदारालाही 50 कोटीची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली. ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर देशभरातून भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी यांनी एक पत्रच पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवले आहे.
“मै आपका नौकर रहना चाहता हूँ, असं पत्र विनायक सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलं होतं. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. तर या पत्रात तसा मजकूर आहे. देवेंद्र फडणवीसयांना हे पत्रं वाचायचं असेल तर ते वाचू शकतात”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.