How To Activate DND : तुम्हालाही विनाकारण स्पॅम कॉल्स येतायेत का? तर फक्त करा ‘हे’ एक काम, कॉल्स येणे होईल बंद…

Ahmednagarlive24 office
Published:

How To Activate DND : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्पॅम कॉल्स ही एक मोठी समस्या बनली आहे. अशा वेळी अनेकजण हे कॉल्स बंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र तरीही हे कॉल्स येत असतात.

अशा वेळी ही समस्या सोडवण्यासाठी ट्रायने दूरसंचार सेवा पुरवठादारांना एक आदेश जारी केला आहे. त्यांनी कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी डीएनडी सेवा सुरू करण्यास सांगितले आहे.

सरकारने डीएनडी सेवा अतिशय सुलभ केली आहे. DND सेवा दोन प्रकारे सुरू करता येते. एक एसएमएस आणि दुसरा कॉल. या दोन सोप्या मार्गांनी DND सेवा चालू करता येते.

एसएमएसद्वारे डीएनडी सेवा कशी सक्रिय करावी?

एसएमएस करण्यासाठी, तुम्हाला मेसेजिंग अॅपवर जावे लागेल.
– START 0 टाइप करावे लागेल आणि 1909 वर संदेश पाठवावा लागेल.
असे केल्याने DND सेवा कार्यान्वित होईल.

कॉल करून DND सेवा कशी सक्रिय करावी?

– डायलर अॅप उघडा.
– 1909 वर कॉल करा.
– तुम्हाला काही सूचनांचे पालन करावे लागेल.
हे केल्यानंतर, DND सेवा सक्रिय होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe