WhatsApp वरून फ्रेंडशिप डे स्टीकर्स व मित्रांना विश कसे करायचे ? वाचा सोपी माहिती…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे अर्थातच मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. यावेळी १ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जात आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो.

सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅप, फेसबुक, एसएमएस, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छांचा देताना दिसत आहेत. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेन्डशिप डे वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेन्डशिप डे साजरा केला जातो.

तर काही जागांवर हा डे पहिल्या रविवारी नाही तर २ तारखेला हा डे साजरा करतात. सध्या सोशल मीडियामुळे आभासी जगात का होईना, मैत्री जपणे, टिकवणे आणि वाढवणे एकार्थाने सोपे झाले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत WhatsApp वरून फ्रेंडशिप डे स्टीकर्स व विश कसे करायचे या बद्लची माहिती यासाठी

सर्वात प्रथम WhatsApp चॅट उघडा.ज्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायचा आहेत, त्याच्या चॅटबॉक्सवर जा. यानंतर टाइपिंग बॉक्समध्ये smiley आयकॉनवर क्लिक करा. येथे खालील बाजूला Square आयकॉन दिसेल. यानंतर + चिन्हावर गेल्यानंतर Get More Stickers वर टॅप करा.

येथे तुम्हाला WAStickerApps इंस्टॉल करावे लागेल. येथे Happy Friendship Day लिहून सर्च करा. जे स्टिकर्स येतील त्यांना Add To WhatsApp करा. असे केल्यानंतर सर्व स्टीकर्स WhatsApp च्या आत My Stickers मध्ये उपलब्ध होतील. आता तुम्ही तुमच्या मित्रांना हे स्टिकर्स पाठवून फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe