दसरा ते दिवाळीच्या काळात ‘या’ शेअर्समधून मिळालेत जबरदस्त रिटर्न ! 65 टक्के रिटर्न देणारे शेअर्स कोणते आहेत?

Published on -

Share Market News : मध्यंतरी भूराजकीय तणावामुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये सुधारणा होत असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या पंधरा-वीस दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधील काही कंपन्यांकडून चांगला परतावा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यातील अखेरच्या तीन दिवसांमध्ये देखील मार्केटमध्ये मोठी तेजी होती आणि यामुळे गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळाले आहेत. अशा स्थितीत आज आपण दसरा ते दिवाळीच्या काळात गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेल्या काही शेअर्स बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Deep Diamond India – दसऱ्यापासून या कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 50% रिटर्न मिळाले आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 6.85 रुपयांवर क्लोज झाला. यामध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी थोडीशी घसरण झाली.

Chandrima Mercantiles – दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत या स्टॉक मध्ये सर्वाधिक वाढ नमूद करण्यात आली आहे. दसऱ्यापासून आत्तापर्यंत या स्टॉक मध्ये 65 टक्क्यांची वाढ झाली असून यामुळे गुंतवणूकदार चांगलेच मालामाल बनले आहे. शुक्रवारी सुद्धा या स्टॉक मध्ये दोन टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली आहे. तसेच एका महिन्याच्या काळात हा स्टॉक 91 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या हा स्टॉक 8.11 रुपयांवर व्यवहार करतोय. तसेच मागील सहा महिन्यांच्या काळात या स्टॉकने 190% रिटर्न दिले आहेत.

BITS – या शेअर्समध्ये दसऱ्यापासून आत्तापर्यंत 47 टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी या स्टॉक मध्ये दहा टक्क्यांचे अप्पर सर्किट पाहायला मिळाले. हा स्टॉक सध्या बारा रुपयांवर व्यवहार करतोय.

EVOQ Remedies – दसऱ्यापासून आत्तापर्यंत या कंपनीचे स्टॉक 46 टक्क्यांनी वाढले आहेत. शुक्रवारी सुद्धा या कंपनीच्या स्टॉक मध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली. सध्या हा स्टॉक 5.74 रुपयावर व्यवहार करतोय.

Welcure Drugs & Pharmaceuticals – या कंपनीच्या स्टॉकने दसऱ्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 41% रिटर्न दिले आहेत. फार्मा सेक्टर मधील या कंपनीचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहेत. हा शेअर 0.74 रुपयांवर व्यवहार करतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe