India News:ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांकात २०२२ मध्ये भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. एकूण १२१ देशांपैकी भारत १०७ व्या क्रमांकावर आला आहे.
विशेष म्हणजे पाक, श्रीलंका व नेपाळ ही शेजारी राष्ट्रे आपल्या पुढे आहेत. भूक निर्देशांक यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात.
यामध्ये कुपोषण, पाच वर्षांच्या खालील मुलांना त्यांच्या उंचीच्या तुलनेत किती कमी आहार मिळतो, पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे आणि दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुलं दगावतात या निकषांच्या आधारे जागतिक भूक निर्देशांकाची मांडणी केली जाते.
जागतिक भूक निर्देशांक यादीमध्ये भारताची १०१ व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक दिवाळखोरीत आलेला पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.
तिक भूक निर्देशांक यादीमध्ये भारताची १०१ व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक दिवाळखोरीत आलेला पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.