Toyota Innova HyCross Hybrid : टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) येत्या काही महिन्यांत तीन नवीन कार लॉन्च करणार आहे. कंपनीच्या आगामी कार लिस्टमध्ये नवीन अर्बन क्रूझर Hyryder SUV, अपडेटेड अर्बन क्रूझर (updated Urban Cruiser) आणि इनोव्हा हायक्रॉस हायब्रिडचा (Innova HyCross Hybrid) समावेश आहे. चला जाणून घेऊया टोयोटाच्या आगामी कार्सबद्दल
टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder (Toyota Urban Cruiser Hyryder)
टोयोटाने नुकतीच Hyryder SUV ला उतरवले. ऑगस्ट 2022 च्या अखेरीस त्याची किंमत जाहीर केली जाऊ शकते. Hyryder मध्ये पॉवरट्रेनचे पर्याय उपलब्ध असतील. यापैकी एक 1.5 लिटर पेट्रोल सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह आणि दुसरे टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह आणि 1.5 लिटर इंजिनसह येईल. Hyryder चार प्रकारात येईल – E, S, G आणि V. टोयोटाने आगामी एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. हे 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुक केले जाऊ शकते
![](https://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/wp-content/uploads/2022/07/Toyota-1024x576.jpg)
टोयोटा अर्बन क्रूझर (Toyota Urban Cruiser)
रिपोर्ट्सनुसार, Hyryder नंतर कंपनी अपडेटेड अर्बन क्रूझर SUV आणू शकते. त्यात नव्या ब्रेझाप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. फीचर्सच्या बाबतीत, यात वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि व्हॉइस रेकग्निशनसह नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिम-आधारित कनेक्टेड कार सूट, वायरलेस चार्जिंग सिस्टम आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांसारख्या फीचर्स येईल. यात 1.5 ड्युएलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे 103bhp पॉवर आणि 136.8Nm पीक टॉर्क जनरेट करेल.
![](https://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/wp-content/uploads/2022/07/Toyota-1-1024x576.jpg)
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड (Toyota Innova HyCross Hybrid)
काही अहवालांनुसार, टोयोटा दिवाळीच्या आसपास भारतात नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड एमपीव्ही सादर करू शकते. हे 2022 च्या उत्तरार्धात किंवा 2023 च्या सुरुवातीला बाजारात लॉन्च केले जाऊ शकते.
![](https://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/wp-content/uploads/2022/07/Toyota-Innova-HyCross-Hybrid.jpg)
नवीन इनोव्हा हाय क्रॉस हायब्रीड सध्याच्या इनोव्हा क्रिस्टा बरोबरच विकली जाईल. आगामी MPV ट्विन-मोटर 2.0-लीटर पेट्रोल हायब्रीड सिस्टमसह ऑफर केली जाऊ शकते. याशिवाय, कंपनी यामध्ये नवीन THS II (Toyota Hybrid System II) ची स्थानिक आवृत्ती वापरू शकते, असेही सांगितले जात आहे. या कार्स व्यतिरिक्त, ऑटोमेकर त्याच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या SUV फॉर्च्युनरला नवीन पिढीचे अपडेट देखील देईल. रिपोर्ट्सनुसार, या SUV चे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते.