हैद्राबाद चकमक : सुप्रिम कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळला, दिला हा आदेश

Published on -

Maharashtra news : हैदराबादमध्ये २०१९ मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केले होते.

पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळून याप्रकरणी चौकशी आयोग नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

या चार आरोपींनी पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळ काढला, हा पोलिसांचा दावा खोटा असून आरोपींना मरण्यासाठीच जाणूनबुजून गोळीबार करण्यात आला. तो स्वसंरक्षणार्थ म्हणता येणार नाही, असा निष्कर्ष कोर्टाने काढला आहे.

त्यामुळे या प्रकरणी हैद्राबादचे पोलिस अडचणीत आले आहेत.हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर देशभरातून अनेक नागरिकांनी तसेच मान्यवर व्यक्तींनीही आनंद व्यक्त करत पोलिसांचे समर्थन केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe