Hyundai Cars Discount : एप्रिलमध्ये Hyundai च्या या कारवर मिळतेय हजारोंची बंपर सूट, किती होणार पैशांची बचत? जाणून घ्या सविस्तर

Published on -

Hyundai Cars Discount : तुम्हीही ह्युंदाई कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai Motors एप्रिल २०२३ मध्ये त्यांच्या काही ठरविक कारवर बंपर सूट देत आहे.

तुम्हीही तुमच्या स्वप्नातील ह्युंदाई कंपनीची कार कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या डिस्काउंटमुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कार घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

ह्युंदाई कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो बाजारात अधिक लोकप्रिय आहेत. ह्युंदाई कंपनीकडून कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकही ह्युंदाई कंपनीच्या कारकडे अधिक आकर्षित होत आहेत.

खालील कारवर ह्युंदाई कंपनीकडून सूट दिली जात आहे

Hyundai Kona EV

देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तसेच त्यांच्या मागणीत देखील वाढ होऊ लागली आहे. ह्युंदाई कंपनीने देखील त्यांची Hyundai Kona ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर केली आहे. या कारवर ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Hyundai Grand i10 Nios

ह्युंदाई कंपनीची ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली Grand i10 Neos वर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारवर कंपनीकडून २० हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8 लाख रुपये आहे.

Hyundai i20

ह्युंदाई कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय असलेली कार i20 वर देखील मोठी सूट दिली जात आहे. i20 ही कार कंपनीच्या कारपैकी सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. या कारवर कंपनीकडून १० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

Hyundai i20 कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.58 लाख रुपये आहे. जर तुम्ही या महिन्यामध्ये ह्युंदाई कंपनीच्या या कार खरेदी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही हजारोंची बचत होईल. तसेच फायनान्स कंपनीकडून देखील तुम्हाला ऑफर दिल्या जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News