Auto Expo 2023 : भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या दिवसेंदिवस नवनवीन कार लॉन्च करत आहेत. तसेच इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने आता कंपन्यादेखील इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत.
Hyundai कंपनीने Ioniq 5 ऑल-इलेक्ट्रिक क्रॉसओवर SUV भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ऑटो एक्स्पो 2023 पहिल्याच दिवशी ही कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या लूक आणि लोड व्हेरियंटने ग्राहकांना वेड लावले आहे.
Hyundai ने लॉन्च केलेल्या Ioniq 5 इलेक्ट्रिक कारची किंमत 44.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारचे बुकिंग 21 डिसेंबर 2022 पासून सुरु झाले आहे. पहिल्या ५०० ग्राहकांसाठी बुकिंग रक्कम 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
वैशिष्ट्ये
नवीन Hyundai Ioniq 5 एकाच पॉवरट्रेन पर्यायासह लॉन्च करण्यात आली आहे. यात सिंगल मोटर सेटअप समाविष्ट आहे जे त्यास रियर-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन देते. या कारची इलेक्ट्रिक मोटर 217 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे.
ही कार 800V फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यास सक्षम आहे. ही कार 18 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज होऊ शकते. Ioniq 5 एका चार्जवर अंदाजे 631 किमीची रेंज देते. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
बाहेरील लूक
Ioniq 5 कंपनीने प्रथम फ्रँकफर्ट मोटर शो दरम्यान सादर केली होती, याशिवाय तिला 2022 वर्ल्ड कार ऑफ द इयर, वर्ल्ड डिझाईन ऑफ द इयर आणि वर्ल्ड इलेक्ट्रिक कार ऑफ द इयरचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
त्याचा बाह्य भाग खूपच आकर्षक आहे. ती तीक्ष्ण रेषा, सपाट पृष्ठभाग आणि उच्च दर्जाच्या विंडस्क्रीनने सुशोभित आहे. 20-इंच मिश्रधातूची चाके आणि चाकांची टर्बाइनसारखी रचना त्याचा साइड लुक वाढवते. ग्राहकांचीही चांगली पसंती या कारला मिळत आहे.