Hyundai Car Price Hike : ह्युंदाईच्या अनेक कार्स भारतीय बाजारात प्रसिद्ध आहे. शानदार फीचर्स आणि किंमत जास्त नसल्यामुळे या कार्सला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच ही कंपनी सतत आपल्या नवनवीन कार्स लाँच करत असते. नुकतीच या कंपनीने आपली Grand i10 Nios फेसलिफ्ट लॉन्च केली आहे.
अशातच ह्युंदाईने आपल्या सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या i20 N Line कारच्या किमतीत दरवाढ केली आहे. कंपनीने यात आकर्षक फीचर्स दिली आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. ग्राहकांना आता किती पैसे मोजावे लागणार जाणून घेऊयात.
अशा आहेत Hyundai i20 N Line आणि दोन नवीन कारच्या किमती
Hyundai i20 N Line च्या स्टँडर्ड i20 च्या स्पोर्टियर व्हेरियंटची किंमत एकूण 16,500 रुपयांपर्यंत वाढली असून दरवाढीनंतर या कारसाठी 10.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागणार आहेत. अशातच कंपनीने नुकतीच Grand i10 Nios फेसलिफ्ट लॉन्च केली असून तिची सुरुवातीची किंमत 5.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. याशिवाय कंपनीने आणखी एक CNG कार लॉन्च केली असून तिची किंमत 6.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
इतके असणार मायलेज आणि पॉवरट्रेन
Hyundai i20 N लाइन 1 पेट्रोल इंजिन पर्यायासह उपलब्ध असून याचे पेट्रोल इंजिन 998cc चे आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. i20 N लाइन मायलेज 20.0 ते 20.25 kmpl आहे.
जाणून घ्या फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला 10.25-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळत आहे. तसेच तुम्हाला बॉसची साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल सिस्टीम पाहायला मिळते. तसेच यात रेड कलर अॅम्बियंट लायटिंगही पाहायला मिळते.
सेफ्टी फीचर्स
सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6 एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन आणि हिल असिस्ट सारखी सेफ्टी फीचर्स कंपनीने दिली आहेत.