Sanjay Raut : राज्यातील शिंदे आणि भाजप सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्यावधी लागण्याची शक्यता अनके पक्षाकडून वर्तवण्यात येत आहे.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना “महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही” असे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उचांवल्या आहेत.

रावसाहेब दानवे पुढे बोलताना म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.
रावसाहेब दानवे यांच्या याच वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात.
दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकते. म्हणजे सरकार पडू शकते म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
येत्या काही दिवसांत शिंदे-भाजप सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आताच्याच घडीला अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर किती आमदारांना मंत्रिपद मिळणार आणि किती नाराज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.