मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (Ed) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राऊत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे.
राऊत यांचे राज्यसभेत (Rajyasabha) देखील रोषाचे रूप पाहायला मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. ही भेट जवळपास २५ मिनिटे चालली आहे.

नुकतेच राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांचे आभार मानले आहेत. यावेळी ते म्हणाले, मविआ नेत्यांवर दबावासाठी कारवाई सुरू आहे, त्याबाबत पवारांनी याकडे मोदींचं लक्ष वेधलं आहे.
महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे. आता पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने हे मोदींना सांगणं म्हणजे देशात ज्या ठिकाणी भाजपची सरकारं नाहीत. त्या सर्व विरोधी पक्षांचे हे प्रतिनिधीत्व आहे.
शरद पवारांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेत काम केलं आहे. त्यांच्या विचारांची उंची वेगळी आहे, त्यामुळे त्यांनी मोदींवर समोर विचार मांडले, हे अत्यंत महत्वाचे आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
तसेच मला माझ्या पक्षातील सर्वांचा पाठिंबा आहे, उद्धव ठाकरे सतत माझ्या संपर्कात आहेत. प्रियंका गांधी यांचाही मला फोन आला होता.
अनेक नेत्यांचा मला पाठिंबा मिळतोय, तसेच आमच्यात घाबरण्यास मनाई आहे आणि मी लढणारा माणूस आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.