अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- “अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची ओळख आहे. आधी नितीमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर निलेश, मेहबूब शेख यांना शिकवा.”
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या या टीकेनंतर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. शेख यांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी “मी काय आहे तुमच्या बापाला विचारा” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर “वाघावर… कोल्हे कुत्रे भुंकताहेत 🤣😂 कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते. म्हणून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू झाली आहे. मी काय आहे… काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही.”
अशी पोस्ट केली आहे. या पोस्ट सोमब त्यांनी डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो शेअर केला आहे. चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना मेहबूब शेख म्हणाले की, “अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची ओळख आहे. आधी नितीमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर निलेश, मेहबूब शेख यांना शिकवा.”
“तुमच्या नवऱ्याने लाच घेतली बरं यांनी लाच कशात तर 1997 ला गांधी हॉस्पीटलमधे एका शस्त्रक्रीयेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताच्या भावाने तक्रार केली की रुग्णालयाच्या चुकीमुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला.
तेव्हा यांचे पती किशोर वाघ यांनी तक्रारदाराला सल्ला दिला तू नोकरी माग आणि 15 लाख रुपये माग आणि हे सगळ करण्यासाठी त्या तक्रारदाराकडं 4 लाख रुपयांची लाच मागितली.
मी नाही तर त्या फिर्यादीने सांगीतलय. म्हणजे मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद तुमची तुम्ही आम्हाला नितीमत्ता शिकवताय?” अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम