मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असून यावेळी त्यांनी थेट मोठे विरोधक भाजप (Bjp) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची पाठ थोपटली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी नारायण राणेंना मानतो.. नारायण राणेंनी बंड करण्याआधी राजीनामा दिला होता, असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी त्यांना मानतो, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे.
तसेच राणेंचा दाखला देत राऊतांनी शिंदे (Eknath Shinde) गटाला आव्हान दिले आहे. जेवढेपण आमदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरं जावं, असंही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आमदारांशी आपला संपर्क झालेला असल्याचा दावादेखील केली. ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते. राजकीय संकटात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार ठामपणे उभं आहे आणि उभं राहिलं, असा विश्वासही त्यांनी यावेळेला व्यक्त केला आहे.
त्याचसोबत आपआपल्या मतदारसंघात तरी तुम्ही निवडून येऊ शकता का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा, असंही त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खूपसत नाहीत, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला. तसेच बंडखोर आमदारांना कधी ना कधी मुंबईत यावंच लागणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.