“काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान, विखेंना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नाही” : छगन भुजबळ

Content Team
Published:

नाशिक : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सुजय विखेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सुजय विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, तसं काही नसतं सगळ्यांना कल्पना आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम मुख्यमंत्र्याच्या शिवाय होत नाही.

मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना काय दिवस दूर राहावे लागले. तरीपण त्याचे अधिकारी त्यांच्यापासून ऑर्डर घेऊन काम करत होते. काँग्रेसचे (Congress) पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान दिला जातो.

विखे यांना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नसून पण आमच्याकडे होते त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

तसेच मुंबईत आमदारांना घरे देण्यावरूनही राज्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यावरही छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, आत्तापर्यंत मुंबई शहरामध्ये पोलीस,आयएसओ ऑफिसर, वेगवेगळे कलाकार या सगळ्यांना हाउसिंग सोसायटीमध्ये जागा देऊन त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधकाम करून मुंबईमध्ये स्थायिक झाले आहे.

ज्याप्रमाणे इतरांना घरे देत आहोत त्याचप्रमाणे आमदारांना सुद्धा सोसायटी, इमारत करून देतील. मात्र यासाठी आमदारांना इतरांप्रमाणे जो खर्च येणार आहे तो द्यावा लागणार आहे.

इतरांना जशी घरं मिळतात तसेच ज्या आंमदारांना घरे नसतील तिथे अशा आमदारांना तिथे घरे मिळतील. पैसे देऊन इतरांप्रमाणे घरं मिळणार असतील तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe