“राऊतांना जागतिक स्तरावर अध्यक्ष पद देणार असतील तरी माझे काही नाही”; चंद्रकांत पाटलांच्या राऊतांना कोपरखळ्या

Published on -

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत चर्चेत असतात. महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) सरकार येण्यापूर्वी संजय राऊत यांची महत्वाची भूमिका असल्याचेही बोलले जात आहे. भाजप (BJP) नेत्यांवर संजय राऊत यांचा सतत टीकेचा सूर असतो. त्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊत यांना कोपरखळ्या मारल्या आहेत.

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले, संजय राऊतांवर बोलायचे नाही म्हणत त्यांना राऊतांना कोपरखिळ्या मारल्या आहेत. सध्या सामना (Saamna) वाचायचा नाही आणि संजय राऊत वर बोलायचे नाही असे ठरवले आहे असा खोचक टोला पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.

तसेच राऊतांना जागतिक स्तरावर अध्यक्ष पद देणार असतील तरी माझे काही नाही अशी कोपरखळी देखील चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावली आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले, मी पडळकरांचं मनापासून अभिनंदन करतो.

अतिशय शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. शेवटी पोलीस देखील हतबल होते आणि ड्रोनद्वारे फुले टाकली अशा शब्दात त्यांनी कौतुक केले आहे.

हे सरकार पूर्णपणे हिंदू विरोधी सरकार आहे. यांच्याकडे श्रद्धा ही नाही, शून्यता बाथल असे हे सरकार आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

तसेच वीज कर्मचारी आंदोलनाविषयी ही त्यांना भाष्य केले आहे. या सरकारचे नाक दाबल्या शिवाय चालणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

देशाचे पंतप्रधान मोदी यांनी कोविड संपल्यानंतर सगळी बंधन काढली. मग आता आंबेडकरज यंतीला बंदी आणली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe