“मी बोललो होतो, पण ते झाले नाही…शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार”; रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका

Content Team
Published:

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप (BJP) कडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही शिवसेनेची भविष्यवाणी वाचली आहे.

शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

4 राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाला. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा हात आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवले.

त्यांनी केलेल्या विकासकामामुळे यूपीमध्ये भाजपचा विजय झाला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सत्ता मिळाली. मी बोललो होतो, पण ते झाले नाही आणि आप सत्तेत आली. असे म्हणत रामदास आठवलेंनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन देखील केले आहे.

युक्रेन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर काँग्रेसने सरकारच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य आहे. काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे.

मात्र, काँग्रेसमध्ये एकही सक्रिय नेता नाही. आता काँग्रेसला भवितव्य नाही. शिवसेनेची अवस्थासुद्धा काँग्रेससारखी दयनीय होणार आहे. लोकसभेत तीन ते चार जागा येतील की नाही, याची शाश्वती नाही.

त्यामुळे भाजप-शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या समीकरणावर एकत्र यावे. याबद्दल खासदार संजय राऊत भेटले, तर त्यांना सूचना करत असतो असेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe