अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- अलिकडच्या काळात घरगुती गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात आणि मार्चच्या पहिल्या दिवशी किंमत तीन वेळा वाढली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत चार हप्त्यांमध्ये 125 रुपयांनी वाढली आहे. महागाईच्या काळात इंडियन ऑईल आपल्या ग्राहकांना स्वस्त गॅस सिलिंडर मिळण्याची संधी देत आहे.
त्यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या. इंडियन ऑईलने ट्विट केले आहे की आपण अॅमेझॉन पे च्या मदतीने बुकिंग व पेमेंट केल्यास किंमतीत 50 रुपयांचा दिलासा मिळेल.
ग्राहकाला 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये, मुंबईत 819 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये आहे.
19 किलो सिलिंडर दर :- मार्चच्या पहिल्या दिवशी 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 95 रुपयांची वाढ झाली आहे. या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 1614 रुपये, कोलकातामध्ये 1681.50 रुपये,
मुंबईत 1563.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1730.50 रुपये आहेत. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सची किंमत तपासू शकता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|