Chanakya Niti : रोजच्या दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुष अनेक गोष्टी करत असतात. तसेच आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. स्त्री आणि उरुषांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या सुखी संसाराबद्दल सांगितलेल्या आचार्य चाणक्यांच्या गोष्टी आजही उपयोगी पडत आहेत.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धिरणांच्या बळावर चंद्रगुप्त मौर्य या सामान्य बालकाला संपूर्ण भारताचा सम्राट बनवले होते. तरुण-तरुणींना जीवांसाठी निवडण्यासाठीही चाणक्य यांनी काही गोष्टी त्यांच्या ग्रंथात सांगितल्या आहेत.
आजच्या काळात सुखी जीवन जगण्यासाठी पती पत्नीनेच प्रेमसंबंध चांगले असणे खूप गरजचे आहे. लग्नापूर्वी काहींना नशीब साथ देत नाही मात्र लग्न झाल्यानंतर त्याचे नशीब चांगलेच चमकते. त्यांना लग्नानंतर त्यांची बायको ही भाग्यवान ठरत असते.
लग्नानंतर काहींच्या बायका त्यांच्यासाठी भाग्यवान ठरतात कारण आचार्य चाणक्यांनी सांगितलेले खालील हे गुण त्यांच्यामध्ये असतात. चला तर जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले गुण…
1. विवाहापूर्वी जोडीदार निवडताना व्यक्तीने शरीराऐवजी गुणांकडे पाहिले पाहिजे, यामुळे तुम्हाला जडीदाराचा स्वभाव समजेल.
2. पुरुषांनी सुंदर स्त्रियांच्या मागे धावू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नी सद्गुणी असेल तर ती संकटाच्या वेळीही कुटुंबाची काळजी घेते.
3. स्त्रीला बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त असावे. तसेच, त्यांनी संयम बाळगला पाहिजे, अशा स्त्रिया कुटुंब सांभाळण्यास सक्षम असू शकतात.
4. धार्मिक कर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मर्यादित असते. त्यामुळेच त्यांची धर्म आणि कामावर किती श्रद्धा आहे हे लग्नाआधी जाणून घ्यायला हवे.
5. क्रोध हा आचार्य चाणक्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. चाणक्य सांगतात की ज्या स्त्रीला खूप राग येतो ती कुटुंबाला कधीही सुखी ठेवू शकत नाही.
6. अशा स्त्रीशी कधीही लग्न करू नये जी स्वतःच्या इच्छेने लग्न करत नाही, अशी स्त्री तुम्हाला आनंदी ठेवू शकत नाही किंवा तुमचा आदर करू शकत नाही.