Government scheme : अनेकजण बँकेमध्ये गुंतवणूक करतात. परंतु, काही बँकेत ठेवलेल्या रकमेवर खूप कमी व्याज मिळते. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2500 रुपये मिळतील.
विशेष म्हणजे ही योजना 5 वर्षांसाठी असणार आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतील. त्याचबरोबर तुम्ही या सरकारी योजनेत 4.50 लाख रुपयेही गुंतवू शकता.

जर तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने हे विशेष खाते उघडले तर तुम्हाला त्यांच्या शाळेच्या फीची चिंता करण्याची गरज नाही.
अशी आहे योजना
जर तुम्हाला हे खाते चालू करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील.
या योजनेचे व्याज दर 6.6 टक्के इतके आहे.जर तुमच्या मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खाते त्याच्या नावावर उघडू शकता. या योजनेची मुदत केवळ 5 वर्षे आहे, त्यानंतर ती बंद केली जाऊ शकते. म्हणजेच पाच वर्षांत पैसे परत केले जातात. त्याशिवाय प्रत्येक महिन्याला रक्कम मिळत राहील.
मिळवा महिन्याला 2500 रुपये
- जर तुम्ही 10 वर्षाच्या मुलाच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 6.6 टक्के दराने तुमचे व्याज 1,100 रुपये इतके असेल.
- तुम्हाला पाच वर्षांत व्याज 66 हजार रुपये मिळेल. त्याशिवाय शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा परतावा मिळेल
- तुम्हाला तुमच्या मुलासाठी 1100 रुपये मिळतील, जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल.
- जर तुम्ही 4.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा सुमारे 2500 रुपये मिळतील.