नोकरी करणाऱ्यांनी लग्नानंतर ‘ही’ चूक केल्यास अडकून पडेल पीएफचा सगळा पैसा, वाचा महत्वाचा नियम

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. , EPFO द्वारे नोकरदार लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

या अंतर्गत आता EPFO तुम्हाला संपूर्ण 7 लाख रुपयांचा लाभ देत आहे. जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तसेच अनेक फायदे कुटुंबियांना मिळतात.

जर EPFO खातेधारकाने नॉमिनेशन दस्तऐवजांवर कुटुंबाला नामनिर्देशित केलं तर त्याच्या कुटुंबाला याचे सगळे लाभ मिळतात. मात्र जर यात एक चूक केली तर कुटुंबाला नुकसानही होऊ शकतं.

आज आम्ही तुम्हाल EPFO नियमाबद्दल सांगत आहोत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 नुसार, EPF-EPS खातेधारकाला लग्न झाल्यानंतर त्याने आधी केलेलं नामनिर्देशन रद्द होतं.

त्यामुळेच लग्न झाल्यानंतर खातेधारकाला पुन्हा एकदा EPF-EPS खात्यात आपल्या नॉमीनीचं नाव पुन्हा भरावं लागतं. पुरुषांसाठी त्यांची पत्नी तर महिलांसाठी त्यांचा पती या खात्याचा नॉमिनी असतो.

लग्नानंतर रद्द होतं नॉमिनेशन खातेधारकाच्या लग्नानंतर ईपीएफओमध्ये नामांकन करणं गरजेचं असतं, असं केलं नाही. आणि दुर्दैवाने त्या काळात खातेदारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला वा कुटुंबाला त्याच्या ईपीएफओमध्ये असलेल्या पैशांवर दावा करता येत नाही.

त्यामुळे, आठवणीने लग्न झाल्यानंतर ईपीएफओ खात्यात नव्याने नामांकन करणं गरजेचं आहे. जर समजा ईपीएफओ खातेधारकाला कुटुंब नसेल तर तो कुणाही व्यक्तीला आपला नॉमिनी निवडू शकतो.

मात्र, अशा परिस्थितीतही जर त्या व्यक्तीचं लग्न झालं, तर त्याने आधी केलेलं नॉमिनेशन रद्द होतं, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा आपल्या पत्नी वा पतीला नॉमिनेट करावं लागतं.

जर नॉमिनेशन केलं नसेल, तर पीएफची रक्कम कुटुंबात समसमान वाटली जाते आणि खातेधारकाचं लग्न झालं नसेल तर ती रक्कम आई-वडीलांना दिली जाते.

 अशाप्रकारे करा EPF/EPS चं ई-नॉमिनेशन :-

1. तुम्हाला प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ वर जावे लागेल.

2. येथे तुम्हाला प्रथम ‘सेवा’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3. यानंतर तुम्हाला येथे ‘For Employees’ वर क्लिक करावे लागेल.

4. आता ‘सदस्य UAN/ऑनलाईन सेवा (OCS/OTCP)’ वर क्लिक करा.

5. आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

6. यानंतर ‘मॅनेज’ टॅबमध्ये ‘ई-नामांकन’ निवडा.

7. यानंतर स्क्रीनवर ‘Provide Details’ टॅब दिसेल, ‘Save’ वर क्लिक करा.

8. कौटुंबिक घोषणा अद्ययावत करण्यासाठी ‘होय’ वर क्लिक करा.

9. आता ‘कौटुंबिक तपशील जोडा’ वर क्लिक करा. एकापेक्षा जास्त नामनिर्देशित जोडले जाऊ शकतात.

10. कोणत्या नामनिर्देशित व्यक्तीच्या वाट्याला किती रक्कम येईल हे घोषित करण्यासाठी ‘नामांकन तपशील’ वर क्लिक करा. तपशील प्रविष्ट केल्यानंतर ‘जतन करा’

11. ‘ईपीएफ नामांकन’ वर क्लिक करा.

12. OTP जनरेट करण्यासाठी ‘ई-साइन’ वर क्लिक करा. आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. 13. निर्दिष्ट जागेत ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News